निवांत,
निवांत,


जिवंत आहे मन
जिवंत असूद्या माणुसकी
नरकात या धर्तीवर.
हिशोब तर बराबर होणार .
निखाऱ्या सारखं मन जळत.
जेव्हा रक्ताचं नातं, घात करत.
राहायचं तरी किती? शांत.
कधी,कधी असं वाट,
त्या किर्डीच्या बांबू वर झोपायचं निवांत.
ससा आणि कसवाच्या शर्यतीत.
कासवान सुसाट पळाव
कधी तरी ससाने जिताव.
किती धावाचं त्यानं,थोडं जगायचं निवांत.
किती जगायचं दुसऱ्यांसाठी.
कधी तरी जगायचं स्व:तासाठी.
लोकांना वाटतं कुबेर आहे.
त्यांना कोण सांगणार,
घातलेल्या कपड्याला ठिगळ आहे,
गरबीची गरमी आहे निवांत.
हिथे समाधानी नाही मन.
पैशाच्या मागे सारे जण.
माणुसकीचे लुटले धन
ढोंगी दुनिया, फोपावले लबाड पण
फक्त
लुटणारा राहतो निवांत...