महाराष्ट्रात राहता ना?
महाराष्ट्रात राहता ना?


सक्ती नाही कोणावर,
तुम्ही मराठी बोलावं
अरे अमृताची गोडी
थोडी चाकुन तर बघावं
माझा भाषेचे गुणगान
मी मरे पर्यंत गातच राहावं
आम्ही तुमची भाषा बोलावं
तुम्ही आमची भाषा बोलावं
मराठी..
समजाय बाबा वाणी कड्क आहे.
मुखी समजल्यावर आई वाणी मऊ जाई
भली रुजलीना ह्रदयात,
तर आतडी कोतळयाला पण वेड लावेल.
थोडा माज सोडा , तुमच्या जीवाला पण घोर लावेल..
लोकांच्या घोंगडीत उभ शोधनारे
स्व:ता कुडकडत मरतील
बोली भाषा जप भादरा तरच
मराठी भाषेचे संस्कार उरतील.
कोणी दुसऱ्यांनी जपावा हा अनमोल ठेवा
कोण्या दुसऱ्यावर थोपवावा हा रत्न जडा
आपल्या आकलचा कधी फुटणार घडा
बोलत नाही आपली बोली
मोठ्याच्या पंगतीत बसायची घाई
आण म्हणे मराठी राष्ट्र भाषा का?
होहीना ग बाई...