तो..
तो..
बलवान तो, कर्तृत्ववान तो,
तरीही हळवा तो आणि समजूतदार तो.
कुटुंबाचा कणा तो,
आनंदाची खाण तो,
काळानुरूप बदलणारा तो,
तिला सोबत करण्यास तयार तो..
स्वतःचा गर्व बाजूला सारून,
तिच्या समान संधीसाठी झगडणारा तो...
असाच तो, हवाहवासा तो,
विकासाच्या गाडीच दुसरं चाक तो.
समानतेचं वाहन तो,
देशाच्या आपुल्या अभिमान तो....
