# नजर
# नजर
त्या दोघांची नजरानजर
तिलाच काय ती कदर
तो मात्र बेेफिकर.
ती कळी उमलता उमलता
गुुंतून जाते त्याच्या जिवा
तो दूर जाता जाता
वाटतो तिला हवा हवा .
उमलणारी ती कळी
भिरभिरणारा तो भुंगा
होते दोघांची मैत्री
धुंंडाळत नव्या वाटा.
ती नवी चाहूल फक्त तिलाच
तो मात्र त्याच्याच विश्वात.
उमलणाऱ्या तिला होतो
फक्त त्याचाच भास
भिरभिरणाऱ्या त्याच्या मनामनात
दाटेल का तिचा सहवास

