ती...
ती...
1 min
225
ती जीवनदायिनी,
प्रसंगी संहारिणी ही ती.
ओठवरले हसू ती,
पण अश्रू देण्यासही सक्षम ती.
तिची वाट पाहावी इतकी लाघवी ती,
पण वाट लावण्याइतकी धैर्यवान ती.
निर्मळ ती, सुंदर ती,
हुशार ती, धीट ती,
नजर बदलून तर पाहा कळेल तुम्हाला तिच ती....
फेका चष्मा तो कर्मठ दृष्टिकोनाचा,
उमटूद्या सूर नवा तिच्या अंतरंगाचा..
नुसते शरीर सौंदर्य शोधण्यापरी,
घ्या की ठाव तिच्याही मनाचा..
पळुद्या तिलाही, पडूद्या आणि उडुहीद्या,
तिच्यासवे पहा नक्की भरेल
आपुल्या विकासाचा घडा..
तिलाही स्वप्न द्या, स्वातंत्र्य द्या,
सोबतीने तिच्या रंगवू या नाविन्याचा धडा...
