आठवण
आठवण
चोर पावलांनी मनात शिरलास
ठसा मात्र भारी उमटवलास
मनाची दार खुली केलीस
हृदयाच्या खिडक्या मात्र बंंद केल्यास
विचारांची चक्र फिरवलीस,
कृतीच्या चाकांना गतीही दिलीस
आयुष्युयात बऱ्याच नव्या लोकांंचा प्रवेश झाला
पण तुझं जाणं अशक्यच राहिलं
तू बोललास, भेेटलास, भांडलास
पण नकळत काहीतरी शिकवत गेलास
मैत्री होता होता, खास मित्र कधी झालास कळलच नाही
आणि कधी तुझ्यात रमायला लागले याच भानच उरल नाही
खर खोट बर वाईट मला माहीत नाही
पण तुझी आठवण आल्यावाचून
एक दिवसही जात नाही.

