STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Abstract Romance

3  

Sakharam Aachrekar

Abstract Romance

प्रणय स्वप्नं

प्रणय स्वप्नं

1 min
318

वाट चालून संपत नाही

असे गूढ आयुष्य कशाला

मला नसे हव्यास सुखाची

हवा तुझा हा हात उशाला


माझे इथे न काही उरले

तुला वाहिले जीवन सखया

सांभाळ तूच आसुसलेल्या

भावविवश या कातर हृदया


रात्र पांघरुन देहावर या

गोड उद्याचे स्वप्नं पाहते

पहाटस्वप्ने रंगवताना

तुझ्याच रंगी नित्य नाहते


प्रेमलतेची पालवी जिथे

प्रीत आपली सांगत जाते

दवांत भिजून पहाटे तिथे

रानफुले मी वेचित जाते


प्रेम तुझ्या वर करता करता

गुन्हा असाही घडून जावा

प्राण माझा मला सोडूनी

कैद तुझ्या हृदयातच व्हावा


सांज अता पाठी ठेवूनी

रात्र साजिरी कुशीत घ्यावी

बेधुंद उद्याच्या प्रणयाची

गोड गुलाबी स्वप्न पहावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract