रक्षाबंधन
रक्षाबंधन
रक्षाबंधन
नाते एक अनमोल
भाऊ - बहिणीचे असते
जुळते बंधन नकळत
भावनांचे गीत फुलते
शेतकरी हा भाऊ माझा
उन्हातान्हात राबतो
सकलजनास सुखी पाहूनी
आनंदाने तृप्त होतो
सैनिक हा दादा माझा
सीमेवर लढतो
प्राणांचीही आहुती देऊनी
बांधवांचे रक्षण करतो
रक्षाबंधन या सणाला
यांची आठवण ठेवूया
सदैव साथ देवूनी
संस्कार, संस्कृती जपूया