STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
183

नाते एक अनमोल

भाऊ - बहिणीचे असते

जुळते बंधन नकळत

भावनांचे गीत फुलते


शेतकरी हा भाऊ माझा

उन्हातान्हात राबतो

सकलजनास सुखी पाहूनी

आनंदाने तृप्त होतो


सैनिक हा दादा माझा

सीमेवर लढतो

प्राणांचीही आहुती देऊनी

बांधवांचे रक्षण करतो


यांच्या कष्टाची, त्यागाची

जाण आपण ठेवू या

राखी बांधूनी यांच्यासह

रक्षाबंधन साजरा करू या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational