दीपोत्सव
दीपोत्सव
पहिला दिवा हा
आपुलकीचा लावूया
माणसानेच माणसात
निरपेक्ष प्रेम पसरवूया
दुसरा दिवा हा
सर्वधर्मसमभावाचा लावूया
जातीयवाद मिटवून
माणुसकीचा धर्म जपूया
तिसरा दिवा हा
संस्कार, संस्कृतीचा लावूया
समता, बंधुता या
मूल्यांचे संवर्धन करूया
चौथा दिवा हा
सद्भावनेचा लावूया
षट् विकारांवर
ताबा मिळवूया
दीपोत्सव नको
फक्त चार दिवसांचा
आनंदोत्सव असावा
सदैव वर्षभराचा