STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

आईचे महत्त्व

आईचे महत्त्व

1 min
201

आठवते मज उगाच माहेर, डोळा येते पाणी

त्या पाण्यात दिसते आई, आठवते तिची गोड गाणी


प्रत्येक क्षणी आई आल्याचा, भास का होई?

तिच्या मुखी हाक ऐकण्या,जीव कासावीस होई


मैत्रीण, सखी, आई-वडील अशी तिची नाती

संस्कार- संस्कृती जपण्या शिकवी, अशी तिची ख्याती


आई झाल्यावर कळते, उपकार थोर आईचे

रहावे तत्पर ऋण फेडाया, तिने केलेल्या श्रमाचे


चमत्कार घडावा, घडावे जंतर- मंतर

अलगद जावे आईच्या कुशीत, तोडून सगळे अंतर


लागते मोठे भाग्य, अशी मिळाया माऊली

सदैव राहो, माझ्या जीवनी तिची सावली


माझ्या आईच्या, पूर्ण होवोत इच्छा

हीच ईश्वरचरणी, सदैव राहील सदिच्छा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational