अरण्य व लाकुडतोड्या
अरण्य व लाकुडतोड्या
एकदा एक लाकूडतोड्या
अरण्यात गेला
इकडे तिकडे पाहत
रडू लागला
अरण्यातल्या झाडांनी
कारण विचारले
कुऱ्हाडीला दांडा नाही
असे उत्तर मिळाले
ते ऐकून झाडांनी
एक निर्णय केला
चिंचेच्या चिवट लाकडाचा
तुकडा दिला
त्याने तो आपल्या
कुऱ्हाडीला घातला
सगळी झाडे तोडण्याचा
सपाटा लावला
आपणच आपल्या हातांनी
आपला सर्वनाश केला
याचा सर्व झाडांना
पश्चाताप झाला
