STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

4  

Varsha Chopdar

Inspirational

मायबोलीची साद

मायबोलीची साद

1 min
12

मायबोलीची साद

सह्याद्रीच्या कड्याकड्यांत, जिने शौर्य पेरले,
ज्ञानेश्वरांच्या ओवीतून, जिने विश्व व्यापले.
अभंगातल्या विठ्ठलाची, तीच प्रेमळ वाणी,
मराठी म्हणजे साक्षात, महाराष्ट्राची अमृत-खाणी.
जिथे शब्दांतून सांडतो, मातीचा जिव्हाळा,
तिनेच शिकवला आम्हाला, संस्कृतीचा लळा.

पण आज त्याच मराठीची, कुतरओढ का होते?
इंग्रजीच्या वेलीखाली, ती का गुदमरते?
'मम्मी-पप्पां'च्या गर्दीत आता, 'आई-बाबा' हरवले,
संवादाचे ओले शब्द, 'स्टेटस'मध्येच गोठले.
शुद्धलेखन मरू द्या, पण उच्चारही आता थिजले,
मराठीच्या अंगणात, परक्या शब्दांचे इमले चढले.

पुन्हा एकदा गर्जू द्या, मराठीचा हा डंका,
मनातून काढून टाका, आता हरण्याची ही शंका.
वाचा, लिहा आणि बोला, मराठीचा धरा अभिमान,
तरच जगात टिकेल, आपल्या भाषेची शान.
घरच्या भिंतींवर पुन्हा, मराठी शब्द उमटू द्या,
अभिमानाने या मातीचे, ऋण आपण फेडूया.


सौ. वर्षा प्रमोद चोपदार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational