STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

पाणी

पाणी

1 min
206

सृष्टीच्या अंतरंगात 

जलाविना तडफडतो मासा

 सोडून नाही जाणार

 घेतो हा वसा


आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांत

चातकाचे ही असेच असते 

पावसाच्या थेंबाशिवाय 

तहान भागत नसते 


भूतलावर तर 

गोष्टच आगळी

सर्व कामांसाठी 

पाणी लागते वेळोवेळी


पाण्याविना कोणी

जगूच शकत नाही 

पाणी हेच जीवन 

नाकारता येत नाही


ऐका सकल जन हो 

महत्त्व याचे जाणूनी

संरक्षण व संवर्धन 

करूया सर्वांनी मिळूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational