पर्यावरण गीत
पर्यावरण गीत
पर्यावरण गीत
डोंगर-दरी, हिरवी वनराई,
नदी, नाले, पक्ष्यांची गाणी भाई.
स्वच्छ हवा आणि थंडगार पाणी,
हीच तर आपल्या जीवनाची कहाणी.
निसर्गाची अशी ही किमया
संकटात मिळते आधाराची छाया
आज मात्र चित्र जरा वेगळे दिसते,
सिमेंटचे जंगल चोहीकडे वसते.
प्लास्टिकचा कचरा, धुराचा हा थर,
दुषित झाली हवा, प्रदूषित हे घर.
झाडे तोडतो, स्वार्थापोटी वागतो,
निसर्गाला दुखावूनी, स्वतःच हरवतो.
एक झाड लावू, जीवनदान देऊ,
पाण्याचा प्रत्येक थेंब जपून ठेवू.
कचरा नको रस्त्यावर, वर्गीकरण करू,
ओला-सुका कचरा वेगळाच करू.
'Reduce, Reuse, Recycle' मंत्र जपूया,
सगळ्यांनी मिळून 'स्वच्छ भारत' घडवूया.
निसर्गाचे हे देणे, चला जतन करूया!
पृथ्वीचे हे वैभव, चला सुरक्षित ठेवूया!
चला हात जोडू सारे, एक नवा संकल्प करूया!
पर्यावरणाचे रक्षण, आज आणि उद्याही करूया!
सौ .वर्षा प्रमोद चोपदार
