STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Abstract

3  

Sonali Butley-bansal

Abstract

तीचे शब्द

तीचे शब्द

1 min
735

तीचे शब्द तीच्या अवतीभवती फीरत असतात

अन् ती अविरत बोलत असते त्यांच्याशी

ती विसरते मग सभोवतालचे जग

तेव्हा जग म्हणतं खुळ लागलय हीला. ..


तुम्ही तीला बोलू दिलं असतं दोन शब्द ,

सामावून घेतलं असतं तुमच्या रितीरिवाजात अन् संस्कृतीत , रोजच्या व्यवहारात ,

तुमचा स्वार्थीपणा बाजूला सारून केलं असतं जवळ

टाकला असता थोडासाच विश्वास. ...


तिच्यातल्या चुका तुम्ही शोधत बसलात

अन् ती तिलांजली देत गेली तीला आत्मविश्वासाने करता येणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्यात सामावण्यासाठी अन्

माणसानं ती उठत गेली पदोपदी. ...


आता तीचं जगणं फक्त शब्दांसाठी ...

काही शब्दांनी तीला हातोहात फसवलं असलं तरी

ती साथ देते आता फक्त शब्दांचीच

तीच्या लेखी शब्दांचा दोष नसतोच मुळी

ते सहजपणे वापरणाऱ्याला त्याचा अर्थच समजत नसतो कधी कधी ...

तीच्या शब्दांना मग तीच समजावत रहाते वेळोवेळी

तीचे शब्द मग तीला समर्थ करत रहातात शब्दबाण झेलण्यासाठी आणी त्यांना जपण्यासाठी. .. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract