STORYMIRROR

Seema Gandhi

Abstract

3  

Seema Gandhi

Abstract

तुझ्या आधी

तुझ्या आधी

1 min
393

मी चांदणे पांघरते ...

तू चंद्र होण्या आधी ...

विरहात तुझ्या बावरूनी...

विरून जाते काळोखात...

तू प्रकाश होण्याआधी...


पुनवेचीची यामीनी होते...

तू चंद्र होण्याआधी...

प्रकाश फुलांच्या पायघड्यांनी  

वितळून जाते तुझ्यात...

तुझे रूप बदलण्या आधी...


श्वासात परीमळलेला गंध होते...

तू प्राजक्त होण्याआधी...

आषाढ मेघात दाटते...

तू घननीळा होण्याआधी...


बाहुंच्या क्षितीजी विसावते...

स्पर्शात तुझ्या मोहरण्याआधी...

हात हाती घेते तुझा...

तसा कायदा होण्याआधी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract