STORYMIRROR

Seema Gandhi

Others

4  

Seema Gandhi

Others

गुगलराव

गुगलराव

1 min
305

काहीही शोधा एकच नाव... 

सगळ्यात हुशार गुगलराव...

सर्च इंजिन आहे सुपर फास्ट...

शोधत असते सगळ्यात बेस्ट...

एका प्रश्नाला उत्तरे हजार...

सगळ्या विषयांवर चर्चेला तयार...

लहान थोर याच्यात रमती ...

याच्याकडे आहेत भारीच गमतीजमती...

पर्यटनापासून डॉक्टर पर्यंत आहेत याच्या ओळखी फार...

विषय असो कोठलाही सेवेसाठी सदा तैयार...

याच्या डिरेक्टरीत नाही हा शब्दच नाही...

साहेबांपासून शिपायापर्यंत भेदभाव नाही...

पत्र तार सारेच केले हद्दपार याने...

ईमेल ,जीमेल शिवाय हलत नाहीत पाने...

पारावरच्या गावगप्पा हल्ली नाहीत रंगत ..

फेसबुक, इंन्स्टा वर हरवली ती गंमत...

फेसबुक, सोशल मिडिया वर आहेत मित्र हजाराच्या वर

वेळ पडल्यावर कामाला एकही नाही तत्पर...

दुरची माणसे जोडली...

जवळची माणस लांब गेली...

कुणी म्हणत याला शिकुन सवरून केली मोठी प्रेमानं

समजून घ्याल तर वागेल आदरानं

...

कुणी म्हणत महाभारतातला संजय...

कुठेही जायचे तर तयार असतो याचा नकाशा...

बरोबर शोधतो हा जवळपास च्या वाटा...

गुगल मुळे दुनिया आली मुठीत...

मोबाईल च्या खेळात झाली सीमित...

डाटा संपला की होते साऱ्यांची पळापळ...

रिचार्ज मारायला करतात सारी धावपळ...

क्षणात हसू...क्षणात ब्लॉक...

सोशल मिडीया वर खेळ लपाछपी चा रंगे...

क्रिकेट, फुटबॉल साऱ्यांच्या संगे...

Onlineशिवाय हल्ली होत नाही काम...

गुगल खेरीज आता कशातच नाही उरला राम...

बऱ्याचदा ठरवते उद्या रहायचे offline...

पण याच्या शिवाय चालत नाही ना लाईफ लाईन...



Rate this content
Log in