STORYMIRROR

Seema Gandhi

Abstract Others

4  

Seema Gandhi

Abstract Others

हिरवी रेषा

हिरवी रेषा

1 min
128

सिमेंटच्या रानी,

इमारतीवर पसरलेली ती हिरवी कोवळी रेषा...

आभाळाची कड धरू पाहणारी...

हिरवी पिवळी...

झाडांची अस्तर...

वाऱ्याची तहान लागलेली...

बऱ्याचदा मौनात ...

विखुरलेल्या नभात...

 मातीच्या भासाची मनात चुळबूळ,

अखंड अविरत  

इमारतीच्या खोल श्वासात भिनत जाते,

माती असल्यागत...

 स्वप्नवत तग धरू पाहणारी मुळं...

पंचप्राणाच्या शोधात...

अविरत...

अन्...पुन्हा

इमारतीवर पसरत जाते एक हिरवी रेष...

भाबडी...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract