संकल्प नवा
संकल्प नवा
नववर्षाचे औचित्य साधुनी
संकल्प करू समानतेचा
सारे एकत्र येऊनी
करु आरंभ ऐक्याचा ||१||
नवे वर्ष घेऊन येई
साज नव्या दिसाचा
पाठलाग करु चला
नव्या उद्दिष्टांचा ||२||
नव्या वर्षात केले
स्वागत नव्या विचारांचे
लेखणी घेतली हाती
मांडले विचार शब्दांचे ||३||
नव्या संकल्पनांच्या सोबतीने
करु सामना आव्हानांचा
उगवता सूर्य देई प्रतिक
नव नवीन विचारांचा ||४||