Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

अतूट बंधन

अतूट बंधन

1 min
219


तुझ्या माझ्या मैत्रीचा

होता सुंदर प्रवास

माझ्या हळव्या मनाला

तुझा लाभे सहवास ||१||


अनोळख्या जगातले‌

मज काहीच कळेना

गेलो हरवून असा

मार्ग काही सापडेना ||२||


जीवनाच्या वाटेवरी 

होतो एकटा चालत 

हात ठेवी खांद्यावरी

तुझी लाभली सोबत ||३||


अनमोल प्रवासात

बंध जुळले मैत्रीचे

हेच एकमेव नाते

असे जीवनी खात्रीचे ||४||


मैत्री आपल्या दोघांची

होती चारच वर्षाची

सोबतीला असताना

दाटे लहर हर्षाची ||५||


सुंदरशा प्रवासात

काळानेच घात केला

जीवनात अर्ध्यावरी

मज सोडूनिया गेला ||६||


मैत्री अतूट बंधन 

आहे आजही मनात

मैत्री अशीच रहावी

अबाधित जीवनात ||७||


मैत्री धागा हा सुखाचा

अनमोल जीवनात

आठवण या मैत्रीची

आहे जपली मनात ||८||


खूप सुखकर झाला

असा मैत्रीचा प्रवास

असे आजही मनात

तुज भेटण्याची आस ||९||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract