STORYMIRROR

Priyanka Patil

Abstract Others

3  

Priyanka Patil

Abstract Others

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटल

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटल

1 min
120

स्वच्छंदी फुलपाखरा प्रमाणे बागडणारी 

मनमुराद ती हसणारी...

फोटो साठी आज उभी राहिली 

खोटेच हासू मग आणू लागली...

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली.....!!


आरशात सतत न्याहाळणारी 

मॅचिंग वॅचिंग करणारी...

दिवसभरात पाउडर ही विसरली 

सकाळचा आंबाडा रात्री जेंव्हा सोडू लागली....

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली....!!


सतत मनमुराद बडबडणारी 

कोणाच ऐकून न घेणारी....

आपल्या मतांचा गळा दाबू लागली 

शून्यात मग हरवू लागली....

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली...!!


बेजबाबदार पणे वावरणारी 

कशाची तमा न बाळगणारी...

जबाबदारीच्या ओझ्याखाली दबू लागली

सर्वांसाठी गृहीत ठरू लागली...

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली...!!


लाडकी म्हणुन मिरवणारी 

हट्टीपणाचे बिरुद लावून फिरणारी...

मुलांच्या हट्टा पुढे नमू लागली 

सर्वांच्या चिंतेत झुरू लागली....

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली...!!


बाबांची राजकुमारी असणारी 

आईच्या अंगणात रमणारी....

अंगणात सडा टाकू लागली 

संसाराचा गाडा ओढू लागली...

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली...!!

तेंव्हा ती पुन्हा नव्याने भेटली....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract