प्रवास 'ती ' चा
प्रवास 'ती ' चा
जन्मापासून मरणापर्यंतचा
‘ती’चा प्रवास नाही हो सोपा...
प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचा
तिचा आपला निराळा खोपा....
ती कधी निर्मळ पाण्याचा
खळखळणारा झरा....
तर कधी घोंगावणारा
सोसाट्याचा करारी वारा...
ती कधी उदास मनाचा
रिकामा कोपरा...
तर कधी धैर्यमेरूचा
अश्वस्त आसरा....
ती कधी प्रसन्नचित
हसणारी फुलराणी....
तर कधी उद्विग्न मनाची
अव्यक्त गुढ वाणी....
ती कधी किनारा गाठणारी
उंच उंच लाट....
तर कधी गोंधळलेली
बिकट दिशाहीन वाट....
ती कधी भरून तृप्त
पाण्याचा घडा....
तर कधी निपचित निर्मनुष्य
रहस्यमय वाडा...
ध्यास माझा उलघडाव्यात
तिच्या प्रवासाच्या वाटा...
रंगीबेरंगी तर कधी बेरंग
जीवनाच्या विविध रंगछटा....!
