अविस्मरणीय सहल
अविस्मरणीय सहल
अहो सर, अहो मॅडम
म्हणत सुरवात झाली सहलीला
पहिली सीट मला मिळावी
म्हणुन बॅग टाकली हजेरीला....
नारळ फोडला नारायणीने
अन् चाके लागली पळू
वाट धरली मग कोकणची
गाडी घाटाकडे लागली वळू....
एव्हढ्यात गाणे लागले वाजू
तसे सर्वजण ठेका लागले धरू
हळू हळू म्हणता म्हणता
आता गाडी लागली दणदणू.....
स्नेहा मॅडम रंगू लागल्या
तशी सहलीत आली जान
साथीला होतेच दिग्विजय सर
धरून ठेका छान.....
उडू लागले हास्यतुषार
हसू लागले सर्व धरून पोट
छोटे मोठे कोणी राहिले नाही
मग आजींनी ही सोडले आपल्या सुनेचे बोट....
पहिली सीट सोडून सर्व
आता शेवटच्या सीट कडे लागले पळू
रोहित सर होते अॅन्करिंगला
त्यांचा फॅशनशो ही होता सुरू हळू.....
सरतेशेवटी, दिग्विजयचा “दिग्या” झाला
स्नेहा मॅडम ची “कोंबडी” झाली
पल्लव आमचा “पालवं” झाला
रसिकाची रस्सा-खा झाली....
सहल आमची अशी रंगून गेली
सर्व एकमेकांत मिसळून गेले
पाऊल पुन्हा घरी वळले
मात्र पुढच्या सहलीचे वेध लागले....!
