श्रावण धारा.....!!!!
श्रावण धारा.....!!!!
श्रावण धारा सरसर वारा
थंड गारवा मधुर मारवा....
सूर शब्दांचे सुंदर बरवा
नभी भिरभिरे आठवांचा पारवा....
त्यात असा हा कसा दुरावा
अंतरी काटा जसा ठसावा.....
श्रावणी सुंदर माळ फुलावा
परि न मनीचा भाव खुलावा.....
योग आगळा जुळून यावा
मग मिलनाचा सोहळा व्हावा.....
बंध प्रेमाचा चिंब भिजवा
इंद्रधनुचा काठ दिसावा.....
हिरवाईचा शेला सजावा
उनाड मनाला जरा विसावा....
गंध तनुचा तनु वसावा
ओला श्रावण ओला व्हावा....!!!

