Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Abstract Others Children

3  

VINAYAK PATIL

Abstract Others Children

आठवतात ते दिवस

आठवतात ते दिवस

1 min
197


तुझी माझी मैत्री मित्रा 

आहे खूपच सुंदर

भाव मैत्रीचा निर्मळ

सदा राहो निरंतर ||१||


एका वळणावरती 

दोघे आपण भेटलो

मैत्रीरूपी विश्वामध्ये

दोघे हरवून गेलो ||२||


मनातली सुखदुःखे 

एकमेका सांगितली

खडतर प्रवासात

साथ सदा निभावली ||३||


चार वर्षाच्या मैत्रीत

सांगे जीवनाचे सार

कशी झाली ताटातुट

केला नियतीने वार ||४||


दिले तुजला वचन

अश्रू गाळणार नाही

कायमस्वरूपी अशी 

आठवण मनी राही ||५||


अशा सुंदर मैत्रीचे

दिवस आठवतात

आठवणी कायमच्या

मनात साठवतात ||६||


आठवतात ते दिवस

सुंदरशा या मैत्रीचे

माझ्या जीवनात होते

एकमेव नाते खात्रीचे ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract