उत्सव रंगांचा
उत्सव रंगांचा
उत्सव रंगांचा
आहे खूप छान
रंग लावण्यात
हरपते भान ||१||
जुने विसरूनी
उधळूया रंग
रंगाच्या विश्वात
होऊ सारे दंग ||२||
मिटवू मनीचे
सारे भेदभाव
मनात जागवू
फक्त प्रेमभाव ||३||
प्रत्येक रंगास
महत्व हे खूप
लावता क्षणाला
निखरते रूप ||४||
रंगांची किमया
आहे अनमोल
रंग जीवनात
खूप बहुमोल ||५||
नको मनी द्वेष
आनंदी राहूया
रंगपंचमीला
रंग उधळूया ||६||
आज आनंदाच्या
रंगात रंगूया
उधळण छान
रंगांची करूया ||७||
चला खेळ खेळू
सुंदर रंगाचा
आज दिस आहे
खूप आनंदाचा ||८||