Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

सहवास आठवणींचा

सहवास आठवणींचा

1 min
183


आयुष्याच्या वळणावरी 

तुझी नि माझी भेट झाली

तुझ्या अमुल्य आधाराने

मज नवी दिशा मिळाली ||१||


मौल्यवान धीराचा हात 

ठेवी सदैव खांद्यावरी 

तुझ्या प्रोत्साहनाने मित्रा

मात केली संकटांवरी ||२||


आपल्या दोघांचीही मैत्री

अशी बहरली सुंदर

भाव सुंदरशा मैत्रीचा

इथे वसतो निरंतर ||३||


तुझ्या मैत्रीचा सहवास

आहे खूपच अनमोल

जीवनाच्या वाटेवरती

मार्ग दाखवी बहुमोल ||४||


केला काळाने असा घात

साथ क्षणार्धात सुटली

आकस्मिक अशा जाण्याने

वीण नात्याची ही तुटली ||५||


सहवास आठवणींचा 

मज आजही आठवतो 

मैत्रीच्या जुन्या आठवणी

या मनामध्ये साठवतो ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract