माय मराठी
माय मराठी
अमृतात भिजले बोल
तिची आम्हावरी सावली
ज्ञाना तुकोबा जनाईस
गोडी मराठीने लावली ll१ll
काळोख सारून युगाचा
साहित्यात रचिला पाया
तिच्या अमूल्य संस्कारांची
आम्हा लेकरांवरी छाया ||२||
माझी मायबोली अवीट
साक्षरतेचे देई धडे
शब्द ज्ञानाचा कल्पतरू
फोफावला सगळीकडे ll३ll
अभिजात माझी मराठी
तिची मुळाक्षरे देखणी
शब्द साजाने अलंकृत
जाई बहरून लेखणी ||४||
गौरव मराठी भाषेचा
अवघ्या जगतात होई
या मराठीच्या पालखीचे
आम्ही सदैव असू भोई ll५ll
हा ध्यास मराठी भाषेचा
आहे प्रत्येकाच्या मनात
गौरव माय मराठीचा
नित्य होईल गगनात ll६ll
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
