अजब गजब प्रेम
अजब गजब प्रेम
अजब तुझे प्रेम आहे
मजला कधी न कळले
कसे नकळत दोघांचे
नाते प्रेमाचे गं जुळले ||१||
मी राहतो नुसता शांत
तुझा मोकळा स्वभाव
मनाच्या या कोपऱ्यामध्ये
फक्त वसतो प्रेमभाव ||२||
माझ्या या शांत स्वभावाला
लगेच समजून घेते
हसत खेळत सतत
सोबत मजला देते ||३||
जातोय दिवस चांगला
तुझी ऐकूनी बडबड
गप्प गप्प राहता अशी
होई मनात धडधड ||४||
काय झाले गं विचारता
करी बोलाया सुरूवात
तिचे बोलणे थांबण्याची
मी बसतो वाट पहात ||५||
सारे म्हणतील आम्हाला
जोडी तुमची ही सुंदर
मी सदैव राहतो शांत
ती बोलतसे निरंतर ||६||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव

