प्रवेशद्वार
प्रवेशद्वार
दार घराचे , प्रवेशद्वार
असावे स्वच्छ , नित सुंदर
सडा रांगोळी , दारापुढची
सांगे घर , पवित्र मंदीर
कुणी उशीरा येता पालथे
भांडे घालती , उंब-यावरी
वाट पाहूनी , काकुळतीला
जीव आईचा , ये वरवरी
कोरोनाने केली , बंदच दारे
घरामधे झाले , सर्व बंदिस्त
शेजारधर्म , शब्द नुरला
संबंधांचा , झाला की अस्त
उघडा दारे , अन् खिडक्या
उघडा कवाडे , मनाचीही
स्नेहबंध जपूनी , आनंदे
जगू सारे , दुस-यासाठीही