वसंत अंगणी
वसंत अंगणी
ऋतू वसंत अंगणी
पानगळ मावळून
मोहरली सृष्टीकाया
अंगी बहर लेवून.........||१||
ऋतूचक फिरताच
गुणगुण कोकीळेची
बिलगून तरूसंगी
सरसर लतिकेची........ ||२||
येता वसंत अंगणी
हास्य गुलमोहराचे
अन् पिवळा बहावा
दान देई सुमनांचे......... ||३||
अंकुरल्या पातीवर
छटा नाजुक कोवळी
गुज कानी सांगण्यात
दंग दिसे कळी कळी....... ||४||
ओजस्विता धरेवर
हर्ष आणसी कवेत
वसंताच्या सोहळ्याचा
ढंग प्रित समवेत...........||५||
