STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract

3  

Pranjali Kalbende

Abstract

परिवर्तन

परिवर्तन

1 min
238

गावाकडच्या हिरवाईची

मजा काही औरच होती

मायेनं बंधनात बांधलेली

सर्वत्र दिसणारी नातीगोती...


पायवाटी लाल,काळी माती

ओलावा ममतेचा सांगोपांग

अनवाणी पायाने चालतांना

फळा फुलांची लागलेली रांग...


दूर कुठे तरी निघून गेली

आज ती गावातली घरं

शहरातल्या उंच उंच इमारती

दूरूनच दिसती छान बरं.....


बंद खिडकीतून कशी डोकावणार

शीतल वा-याची झुळुक

कधीतरी माना उंचावून

पाहावी फक्त ता-यांची लुकलुक...


चकचकणारी घरं शहरी

दिसतात दूरून सुंदर

माणसाच्या आयुष्यात इथे

नसे भावनांना कदर..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract