केशरी
केशरी
सर्जनशीलता ठायी
रंग केशरी घेऊन
कणाकणा उधळती
हास्य मोती रे पेरून ...... १
उत्साहाचे धनधान्य
प्रभातीला उगवती
नरनारी पशूपक्षी
सारेजण सुखावती.......२
तारुण्याचा उंबरठा
शोभे केशरी रंगात
बदलते पाऊल ते
भासे वेगळ्या ढंगात......३
जपलेले सामंजस्य
गुण केशरी रंगाचे
गुणवत्ता वाढविण्या
गुणधर्म पाहायाचे......४
