भाव गुलाबी
भाव गुलाबी
ऱंगात रंगू या
प्रेम स्वरूपाच्या
निर्मळ नितळ
भावना मनाच्या...... १
भिजला प्रेमात
रंग एक छान
गुलाबाचा भाव
उत्साह प्रधान........२
सुंदर रंगात
मोहिनी अपार
तरी समाधानी
साधेपण फार.......३
खेळकरपणा
गुलाबी प्रणयी
स्त्रीत्व जपण्याचा
ध्यास हा वलयी......४
