हिवाळ्याच्या महोत्सवी
हिवाळ्याच्या महोत्सवी
सुर्य किरणं कोवळी
अलगद अंगणात
आले थंडीचे दिवस
निसर्गाच्या प्रांगणात.....१
गारठली सर्व धरा
अंगी धुक्याची दुलई
पांघरूण उबदार
वाजे भानूची सनई.......२
लपंडाव खेळताना
तरू देई साथ छान
डोकावून किरणांची
झळाळते कांती ध्यान......३
गारव्याने दाटलेली
वाट हिरव्या रानाची
गंधाळल्या सूमनांची
काया खुलली दलाची.....४
आले थंडीचे दिवस
हिवाळ्याच्या महोत्सवी
बहरली सृष्टी सारी
रश्मी दिसते लाघवी........५
