हिवाळ्याच्या आवतनी
हिवाळ्याच्या आवतनी
आले थंडीचे दिवस
उजाळल्या आठवणी
दृश्य जरी धुसरसे
हर्षदायी क्षणोक्षणी.....१
सहलीचे हौशी वारे
घोंगावती मनोमनी
भटकंती करण्याचे
देई आव्हान अवनी.....२
ताजी फळं, भाज्या,फुलं
भेटताच रानोवनी
जमे अंगतपंगत
छान आवळी भोजनी......३
शेकोटीच्या आडोश्याला
विसरून तनातनी
जमलेतं मित्र सारे
हिवाळ्याच्या आवतनी.....४
आले थंडीचे दिवस
गोळा होण्या स्नेहजनी
ऋणानुबंधाचा ठेवा
ठेवायला हो स्मरणी.........५
