सण श्रावणी पहिला...
सण श्रावणी पहिला...
सण श्रावणी पहिला
नाव हे 'नागपंचमी'
पुजा नागाची करून
मैत्रीभावी ठेवा उर्मी।।१।।
कृतज्ञता नागाप्रती
व्यक्त कृतीतून व्हावी
नागपंचमीच्या दिनी
पुजा वारूळी करावी ।।२।।
नागदेव शेतीसाठी
नित्य ठरतो रक्षक
कच्चे दुध अर्पियता
नाही होणार भक्षक।।३।।
अग्नी उष्णतेपासून
कच्चे दुध करी रक्षा
सुगंधित पुष्पांचीही
नाग करिसी अपेक्षा ।।४।।
शेती कधी करू नये
श्रावणाच्या महिन्यात
टोकदार शस्त्र सुद्धा
नको कुणाच्या हातात||५||
