गारवा
गारवा
धुके दाटले वाटेत
आलिंगन अलवार
प्रवासाची सुंदरता
वाढे गारव्याने फार.....
काष्ठ उभे काठावर
मार्गदाता होऊनिया
रस्ता ओलांडताना तो
दिशा सुचक बनूनिया.....
वाटचाल गारठली
धुसरता पांघरून
निसर्गाच्या सान्निध्यात
रमलेले छंदी मन.....
मंद झोंबणारा वारा
थबकले तिथे पाय
धुके दाटल्या प्रभाती
चढे ममतेची साय....
