सृष्टी हिरवी..
सृष्टी हिरवी..
रमणीय निसर्गाचे
रूप खुले चराचरी
नवचैतन्याचे लेणे
सृष्टी हिरवी सुंदरी.....१
सप्तरंगी श्रावणात
इंद्रधनू आसमंती
रंग भरले पुष्पात
चाफा,गुलाब,शेवंती....२
हिरवळ चोहिकडे
सुखावली वसुंधरा
तनमन आनंदाने
म्हणे स्वर्ग हाच खरा.....३
ऋतू श्रावणमासाचा
दाटलेली हिरवळ
मंद मंद झुळूकेने
मिटे सारी मरगळ.......४
श्रावणात अवचित
येई सरीवर सर
होई हिरवेगार हे
रानोमाळ निरंतर .....५
