STORYMIRROR

Mangesh Medhi

Abstract

4  

Mangesh Medhi

Abstract

तिळगुळ

तिळगुळ

1 min
534

तिळ तिळ, जोडूनि प्रेम

गोड गोड मुखी गुळ

आनंदाचा मिळे गोडवा

तिळगुळ घ्या गोड बोला


तिळ तिळ मिटे दुरावा

गोड बोल मिटे कटुता

हात मैत्रीचा दिन मैत्रीचा

तिळगुळ घ्या गोड बोला


तिळ तिळ उब वाढवी

उब प्रेेेमाची, साथीची

गुळ गोडवा मुखी बोलवी

मैत्री स्नेह धन श्रीमंती


मैत्री , मित्र माणसे जोडू

माणूसकिचा गोडवा वाढवू

आनंद द्या आनंद घ्या

तिळगुळ घ्या गोड बोला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract