STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Abstract

4  

Vishal patil Verulkar

Abstract

कविता काय असते

कविता काय असते

1 min
530

एका कवीचे शब्द असते...

एका बाळाची निज असते...

एका आईचे अंगाई गीत असते...

एका प्रियकराच्या प्रेमाची प्रित असते...

एका वृद्धाचा आधार असते...

एका बापाचा सहारा असते...

एका दु:खाचा आधार असते...

एका घराचा पाया असते.....


कविता काय असते??

कोणाचे बालपण असते...

तर कोणाचे मोठेपण असते...

कोणाचे गर्व हरण असते...

तर कोणाचे अल्पहरण असते...

कोणाची टीका असते... 

तर कोणाचा शिक्का असते...

कोणाचे भक्षण असते...

तर कोणाचे शिक्षण असते...


कविता काय असते??

मनातील भाव असतात...

तोंडावर आलेले शब्द असतात...

अबोल भावना असतात...

काहींच्या प्रेरणा असतात...

हृदयातील जखमा असतात...

टोचणारे काटे असतात...


कविता काय असते??

रानातील पाणी असते...

जीवनाचे गाणे असते...

प्रत्येकाची कहाणी असते...

वयात आलेल्यांची जवानी असते...

हवेतील स्वर असते...

पाण्यावरचे तरंग असते...

बेरंगी दुनियेतील रंग असते...

प्रत्येकाचे स्वप्न रंगवत असते...


कविता काय असते??

अनाथाची माय असते...

भुकेल्यांची भुक असते...

उन्हातली छाया असते...

तहानलेल्याची तहान असते...

आधाराची काठी असते...

जमिनीवरची माती असते...

मरणाऱ्याचे मरण असते...

पेटणाऱ्याचे सरण असते...


कविता काय असते??

एखाद्याची आशा असते...

एखाद्याची निराशा असते...

एखाद्याचा तमाशा असते...

एखाद्याची अभिलाषा असते...

प्रत्येकाची भाषा असते...

कविता ही वेड्या कवीची

फक्त कल्पनाच असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract