STORYMIRROR

Shubhangi Bhosale

Abstract

4  

Shubhangi Bhosale

Abstract

बीज अंकुरे

बीज अंकुरे

1 min
566

बीजामधील जीवाला

पोसते गं धरणी माय

इवल्याशा बीजामध्ये

जीव ओतते गं माय ||


कोंब फुटता बीजाला

तरारुन मन येतं

कोंबातून फुटे पान

मन आभाळच होतं ||


माय धरणीची जदू

नाही उमगे किमया

मन मनातून पाहे

काळ्या गर्भातील काया ||


खूप खूप खोलवर

मन अंतरात गेलं

तप्त लाव्हा थंड पाणी

दोन्ही त्यात सामावलं ||


काळ्या तनुवर तुझ्या

मेघराज बरसत

पिक हिरवं तरारे

डोले मायेच्या कुशीत ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract