STORYMIRROR

Shubhangi Bhosale

Others

4  

Shubhangi Bhosale

Others

स्त्रित्व

स्त्रित्व

1 min
389

जगण्यासाठी मी

आजही लढते आहे

आस्तित्वाला जपण्या

आजही झटते आहे   ||१||

सावित्रीचे दगड -गोटे

अदृश्य झेलते आहे

एकविसाव्या शतकात 

आजही लढते आहे   ||२||

सिद्ध करण्याआधीच

स्रित्व आड येते आहे

मापदंड तोडण्यासाठी

आजही झटते आहे  ||३||

कोमलतेच्या कोषात

आजही गुदमरते आहे

पोलादाशी लढण्या

मी सज्ज होते आहे  ||४||

विश्वनिर्मितीचा हक्क 

जन्मजात माझ्याकडे

असहकाराचे उत्तर 

नेते विनाशाकडे   ||५||


Rate this content
Log in