राजकारणी
राजकारणी
निवडणूका लढवून
राजकारण खेळता
डाव पेच आखूनीया
गादी तुम्ही सांभाळता
येशी पंख्यात बसूनी
देशाची व्यवस्था पाहता
अंगठे बहादूर राहूनी
देशाचे सूत्रे चालवता
गाडी बंगला भक्कम
खिसे किती रे भरता
आश्वासने आम्हां देऊन
गळे किती रे कापता
राजकारणी पुढारी
छक्के पंजेच खेळता
कडक कपड्यात राहूनी
खोट्या शपथाच घेता
नव्या नव्या योजनांचे
आराखडे बनवतात
अंमलबजावणी करूनी
कागदावरच मांडता
तुम्ही नेतृत्व कर्तृत्व
विसरून अता जाता
राजकारण करण्यात
अखं आयुष्य घालवता