पावसा पावसा
पावसा पावसा
पावसा पावसा रुसलास का ?
ढगात जाऊन लपलास का ?..!!
आभाळात गार गार वाटतं का?
ढगात गडबड करतोय का?
सरसर खाली उतरू या
नदीत आपण पोहवू या ..!!
भर भर खाली येशील का?
माझ्याशी मैत्री करशील का?
गार गार पाण्यात नाचू या
तुझी माझी गाणी गाऊ या..!!
गड गड धड धड करतोस का?
विजेचा कडकडा करशील का?
गार गार गारा झेलू या
झिम्मा फुगडी खेळू या...!!
