ढगांची गंमत
ढगांची गंमत
आकाशात जमले ढग
ढगाने काढलाय पळ
पळपळ गडगड धडधड
ढगाला लागलीय कळ
तोऱ्यात नाचते वीज
वीज चमकते चमचम
ढगात रंगलाय खेळ
ढगात ढोल ढमढम
सो सो सुटलाय वारा
गार गार पाऊसाच्या धारा
सरसर सरीवर सरी
अंगाला झोबताय गारा
टपटप पडतो थेंब
थेंबाने भरले तळे
तळ्यात साचले पाणी
पाण्यात पोहताय मळे
