धगधगते रान...
धगधगते रान...
धगधगते रान सारे जखमांचे जाळे,
होरपळले किती ? विरले कीती उमाळे...
कोरी पाटी श्री गणेशा गिरवा त्यावर,
लिहायला शिकल्यावर बोलणे किती जाळे..
धक्का नको देऊ परंपरेने रचलेल्या घड्यांना,
विस्कटतील वाढेल निस्तरायचे किती माळे...
मी कापुस पिजंलेला वाट पाही होणार वात,
देई प्रकाश मंद कुणाच्या लोचनी किती जळे...
पांदण सांगे वाटसरू गेला रस्त्यावरून आता,
प्रवास पुढचा की परतीचा चालावे किती ना कळे...
कितीदा समजावून सांगावे मनाला इथे सांगा,
जुनेच भाव नव्याने वापरून मानवाला किती छळे...