STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कळी

कळी

1 min
136

कळी कोवळी रंगीत

कशी डौलात बहरे

मंद झुळुकीसरशी

हळुवार ती उभारे


दवबिंदू शिंपणाने

थरारुनी शहारली

रश्मीकिरणांनी तिज

हळुवार ऊब दिली


ठिबकत्या सिंचनाने

झाली प्रमुदित कळी

लाज लाजता हळूच

उमलवी ती पाकळी


मुक्त पिसाट वा-याने

खुलविली डुलविली

रंग गंध भुललेले

भृंग पिंगा भवताली


यौवनाचा भार सुखे

वारा खुशीत डुलवी

जाता रवी मावळून

लीले भ्रमर गुंगवी


मिटे अलगद पुष्प

मार्ग बंद परतीचा

बंदीवान भ्रमराला

नसे मार्ग सुटकेचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract