STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Abstract

3  

Ashok Shivram Veer

Abstract

म्हणे

म्हणे

1 min
156

म्हणे कवितेनं कधी कोणाचं पोट भरतं काय,

शब्दांची जुळवाजुळव करण्याशिवाय यांना दुसरं सुचतं काय

सदानकदा समानार्थी शब्द शोधा,

जणू काही झाली यांना भूताची बाधा


दिवसा असो वा भयान काळ्या रात्री,

कविता सुचणारच याची यांना खात्री

म्हणे कवितेनं कधी कोणाचं पोट भरतं काय,

असं वाटतं यांना तर डोक्याचा भागच नाय


तोंडातून आवाज बाहेर पडतच नाय,

मग तोंडातल्या तोंडात पुटपुटत काय

नजर कशी यांची सर्वत्र भिरभिरते,

डोकं मात्र यांचं कसं नाही गरगरते


म्हणे कवितेनं कधी कोणाचं पोट भरतं,

नाही भरत पोट पण समाधान मात्र मिळतं

झालं यातून समाज प्रबोधन थोडं जरी,

या देहाला वाटतं कसं लयच भारी


म्हणे कवितेनं कधी कोणाचं पोट भरतं काय,

यांना मात्र कविते शिवाय दुसरं काही सुचतच नाय...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract